Chandni Chowk To China Wallpapers
मराठी चि‍त्रपटसृष्टीत सध्या चैतन्याचे वारे वाहत आहेत. नव्या दमाचे, नवा तजेला घेऊन येणारे मराठी चित्रपट प्रचंड लोकाश्रय आणि राजाश्रय मिळवत आहेत. या उत्साहवर्धक वातावरणात आणखी एका दमदार चित्रपटाचं आगमन होते आहे. 'मैत्र एंटरटेन्मेंट' या बॅनरखाली नव्या पिढीतले बिनीचे शिलेदार 'धुडगूस' घालण्याच्या तयारीत आहेत.

गिरीश साळवी, सतीश मोरे, लक्ष्मण साळुंखे आणि स्नेहल तांबे या नाट्य-चित्रवेड्या तरुणांनी एकत्र येऊन 'मैत्र एंटरटेन्मेंट' या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेद्वारे 'धुडगूस' या मराठी मल्टिस्टार-बिगबजेट, भव्य सिनेमास्कोप चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

सुप्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या कसदार लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथेला गिरीश साळवी आणि राजेश देशपांडे यांनी पटकथेत बांधलं असून राजेश देशपांडे यांनीच चमकदार संवादांची फोडणी दिली आहे.सहजपणातून फुलणार्‍या अन् निखळ प्रासंगिक विनोदानं धमाल उडवणार्‍या पण त्याचवेळी सामाजिक भान जपणार्‍या 'धुडगूस' या चित्रपटाचं दिग्दर्शन 'कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक' या सुपरहिट मालिकेचे दिग्दर्शक राजेश देशपांडे करीत आहेत. अनेक मालिका, नाटकांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर देशपांडे यांचा हा पहिलाच मराठी चि‍त्रपट.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक बडे कलाकार 'धुडगूस' मध्ये दिसणार आहेत. संजय नार्वेकर, निर्मिती सावंत, भरत जाधव, पंढरीनाथ कांबळे ऊर्फ
View Source Link ]
Discuss   Add this link to...  Tell a friend   Bury